भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. सुषमा स्वराज यांचं अत्यंदर्शन घेण्यासाठी जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराजला धीर देण्याचाही प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीदेखील श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा स्वराज यांच्या जाण्याने नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले असता त्यांच्या चेहऱ्यावरुन हे स्पष्ट जाणवत होतं. त्यांनी ट्विट करत हे आपलं वैयक्तिक नुकसान असल्याचंही सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले तेव्हा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूदेखील त्यांच्यासोबत होते.

नरेंद्र मोदी यांनी २०१४-१९ दरम्यानच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी जबाबदारी सोपवली होती. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रीपद भूषवताना चांगलीच लोकप्रियता मिळली होती. एका ट्विटर त्यांनी जगाच्या कोपत्याही कोपऱ्यात अडकलेल्या भारतीयाची मदत केली होती.

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचलेले भाजपा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीदेखील यावेळी भावूक झालेले दिसले. त्यांच्या मुलगी प्रतिभा अडवाणी सुषमा स्वराजांची मुलगी बांसुरीच्या गळ्यात पडून रडत होत्या.

मंगळवारी रात्री कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे सुषमा स्वराज यांचे निधन झाले. मंगळवारी रात्रीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत.

भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे त्यांचे ट्वीट अखेरचे ठरले. त्यात त्यांनी ‘मोदीजी धन्यवाद. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहात होते,’ असे नमूद केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi pays last respects to bjp leader sushma swaraj sgy