नवी दिल्ली : आप ही ‘आपदा’ असल्याची कडवी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजवले. आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची शृंखला असल्याचा आरोप मोदींनी केला. या आरोपांना केजरीवाल यांनी, ‘आपत्ती दिल्लीवर ओढवलेली नसून ती भाजपमध्ये आहे’, असे जशास तसे उत्तर दिले. दिल्लीमध्ये मोदींनी शुक्रवारी विविध विकासकामांचे उद्घाटन केले.

झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी दिल्ली विकास प्राधिकरणाने बांधलेल्या घरांच्या हस्तांतरणाच्या कार्यक्रमात मोदींनी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारवर तोंडसुख घेतले. गेली १० वर्षे दिल्लीला ‘आप’दाने म्हणजेच असंख्य संकटांनी घेरलेले आहे. आप सरकारने मद्या घोटाळा, शिक्षण घोटाळा, प्रदूषण घोटाळा असे अनेक घोटाळे केले, भ्रष्टाचार केला. दिल्लीकरांसाठी नव्या सोयीसुविधांपासून वंचित ठेवले, असा आरोप मोदींनी केला.

ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर,…
जेव्हा ‘उंबराला फुल’ येते..!
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
india china loksatta news
चीनच्या कुरापतींवर भारताचे आक्षेप
lifestyle has changed due to modernity and chauvinism
मनातलं कागदावर: बहुपर्यायाचा प्रश्न
Indian express think series
कुशल रोजगारांची आवश्यकता, ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘थिंक सिरीज’मध्ये तज्ज्ञांची चर्चा
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका

हेही वाचा : Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, उपायुक्त कार्यालयावर हल्ला; पोलीस अधीक्षक जखमी, कांगपोकपीत मोठा तणाव

‘भाजपकडून आश्वासनपूर्ती नाही’

दिल्लीची सत्ता गरिबांच्या कल्याणासाठी न राबवता स्वत:च्या भल्यासाठी वापरल्याच्या मोदींच्या आरोपांना केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. मोदी शीशमहलबद्दल बोलतात, पण २ हजार ७०० कोटी खर्चून स्वत:साठी घर बांधले, ८ हजार ४०० कोटींच्या विमानातून ते फिरतात, १० लाखांचा सूट घालतात ही गोष्ट मात्र मोदी लोकांना सांगत नाहीत, अशी उपहासात्मक टीका केजरीवालांनी केली. गेल्या पाच वर्षांत भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. २०२५ पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना घर देण्याचे आश्वासन दिले होते, पण आत्ता १ हजार ७०० घरांचे वाटप झाले. त्याआधी ३ हजार घरे दिली गेली. दिल्लीमधील १५ लाख झोपडपट्टीवासीयांना घरांची गरज आहे. पण, भाजपने दिल्लीकरांची निराशा केली, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

खरी ‘आपदा’ तर भाजपमध्ये आलेली आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही, त्यांच्याकडे लोकांना सांगण्याजोगे काहीही नाही, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे धोरण नाही. -अरविंद केजरीवाल, ‘आप’चे नेते

हेही वाचा : चीनमध्ये पसरत असलेल्या HMPV विषाणूचा भारताला धोका आहे का? आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

मी ठरवले असते तर स्वत:साठी मीदेखील शीशमहल बांधला असता. पण, स्वत:साठी घर न बांधता मी गरिबांसाठी ४ कोटी घरे बांधलीच. देशवासीयांना पक्की घरे मिळावीत हेच माझे स्वप्न होते. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शीशमहलवरून टोला

दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांचे शीशमहल हे सरकारी निवासस्थान होते. या निवासस्थानाच्या सुशोभीकरणावरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरून वाद निर्माण झाला होता. त्याचा संदर्भ देत मोदींनी केजरीवालांवर वैयक्तिक टीका केली.

Story img Loader