पीटीआय, देवभूमी द्वारका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील पंचकुई सागरकिनाऱ्यालगत ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, खोल समुद्रातील प्राचीन द्वारकेचे दर्शन घेणे हा आपल्यासाठी अत्यंत दिव्य अनुभव होता.पांढरे ‘डायव्हिंग हेल्मेट’ आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या नौदलाच्या पाणबुड्या जवानांच्या मदतीने सागरी पृष्ठभागी प्रार्थनेसाठी हात जोडून, मांडी घालत भगवान कृष्णाला अर्पण करण्यापूर्वी मोराची पिसांनी उपस्थितांनी अभिवादन केले. पाण्यातून डुबकी मारून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी म्हणाले की, यामागे माझ्या धाडसापेक्षाही श्रद्धेचा भाग जास्त होता.

याबद्दल आपला अनुभव सांगताना मोदी म्हणाले की, ‘‘जेव्हा आपण या प्राचीन शहराच्या अवशेषांना स्पर्श करत होतो, तेव्हा २१ व्या शतकातील भव्य भारताचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर तरळले आणि मी बराच काळ पाण्याखाली रेंगाळलो. सागरातील द्वारकेच्या दर्शनाने विकसित भारताचा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे’’.

हेही वाचा >>>अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत सहभागी, जागावाटपावरील सहमतीनंतर काँग्रेस-समाजवादी पक्षात मनोमिलन!

द्वारका येथे अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘‘देशाऐवजी एकाच कुटुंबाची प्रगती कशी होईल, यावरच काँग्रेस आपली सर्व शक्ती खर्च करत आहे,’’ असे ते म्हणाले. ओखा आणि द्वारकेला जोडणाऱ्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल पुलाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मोदी म्हणाले, की सर्व घोटाळे संपुष्टात आणण्याच्या आपल्या सरकारच्या कटिबद्धतेमुळेच आता देशाची प्रगती झाली आहे आणि बेट द्वारका आणि मुख्य भूमी ओखा यांना जोडणाऱ्या सर्वात लांब ‘सुदर्शन सेतू’सारख्या केबल पुलाच्या रुपाने भव्य पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णानेच आपल्यावर ही जबाबदारी सोपवली आहे असे त्याबद्दल ते म्हणाले.

हेही वाचा >>>धक्कादायक! हरियाणात INLD पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची गोळ्या घालून हत्या!

४८,००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

गुजरातच्या दौऱ्यावर राजकोट येथे पंतप्रधान मोदी यांनी एम्सचे उद्घाटन केले. तसेच भटिंडा, रायबरेली, कल्याणी आणि मंगलगिरी येथील एम्सचे दूरदृश्य प्रणालीने राष्ट्राला अर्पण केले. स्वातंत्र्यानंतर ५० वर्षांमध्ये केवळ तीन एम्स रुग्णालये होती. आम्ही मात्र वेगाने देशाचा विकास करत आहोत अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi scuba diving along the panchkui coast in gujarat amy
Show comments