आज देशभर मातृदिन साजरा केला जातोय. आपल्या आईविषयी असलेलं प्रेम सादर करण्याचा हा दिवस. आईप्रती असलेली माया, विश्वास दाखवण्याकरता आज सगळेच तिच्याविषयी पोस्ट करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आपल्या आईची सेवा करत असत. गेल्यावर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. परंतु, तरीही त्यांच्या आईची छबी त्यांच्या हृदयातून अद्याप गेलेली नाही. भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या नात्याला उजाळा देण्यात आला आहे. तसंच, ही भारतभूमीही त्यांची आईच आहे, असंही या व्हीडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
“एक मां ने मुझे जन्म दिया, हजारों ने मुझे जनसेवक से प्रधानसेवक बनाया, मैंने मां की सेवा में अपना तन-मन और जीवन अर्पण किया…”, असं भाजपाने पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच, एक व्हीडिओही पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईंनी एकत्र घालवलेले क्षणचित्र देण्यात आले आहेत.
जिसके आँचल में प्यार मिला, वो मा ही तो थी;
जिसके आशीर्वाद मे संस्कार मिला, वो मा ही तो थी;
जो देती रही प्रेरणा, जो भरती रही हौंसला,
ना रुकना, ना थकना, ना डिगना,
जो दे गई ना हार मानने का जज्बा,
वो मा ही तो थी;
मैं भटक रहा था, कूछ खोज रहाँ था,
ना जेब में हरती थी फूट कौडी, लेकीन कभी भी भुखा नही सोया,
जिसने मुझे अपने हिस्से का निवाला खिलाया
वो माँ ही तो थी
कर्म विदित था,धर्म अडिक था, चला आया उस माँ की सेवा में
लेकिन जिसने जनसेवक से प्रधानसेवक बनाया वो मा ही तो थी
जन्म एक माँ ने दिया, पाला हजारों ने
लाख तुफानो से लड पाया क्योकिं सिर पर हाथ दुआएँ, दुलार
जिन करोडो कौशल्या यशोदा स्वरुपों का मिला,
वो माँ ही तो है,
धन्य हुँ मैं जो इस धारा पर जन्म हुआ,
ये तन, ये मन, ये धन,
जिसकी सेवा में अर्पण किया
वो माँ ही तो है!
अशी खास कविता भाजपाच्या अधिकृत खात्यावरून शेअर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं ३० डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक खासप्रसंगी आईचे आशीर्वाद घेण्यास जात असत. त्यांच्या भेटीचे अनेक फोटोही सोशल मीडियावर येत असत. आईवरील प्रेम व्यक्त करताना त्यांनी या भारतभूमीविषयी असलेलं प्रेमही व्यक्त केलंय.