ऐतिहासिक अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तेथील राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. दरम्यान, आता मुस्लीम समाजाकडूनही एक महत्त्वाची मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या बाबरी मशीदीची पायाभरणी करावी अशी विनंती इंडियन मुस्लिम लीगकडून करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालायने २.७७ एकर विवादीत जागेवर राम मंदिर बांधवे जावे, असा निर्णय २०१९ साली दिला होता. तर, धन्नीपूरमध्ये पर्यायी ५ एकर जागेवर बाबरी मशीद बांधण्यासाठी जागा दिली जाईल, असं निकालात म्हटलं होतं. हा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. मंदिराच्या बांधकामासाठी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ स्थापन करण्यात आले होते, तर मशिदीच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे विश्वस्त बदलण्याची मागणी केली जात आहे. इंडियन मुस्लिम लीने मशिदीच्या बांधकामाच्या गतीवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रभू रामाची मूर्तीची जानेवारीत प्राणप्रतिष्ठा होणार असताना मशिदीची पायाभरणीही अद्याप झालेली नाही.

हेही वाचा >> अमेरिकेत अंदाधुंद गोळीबारात २२ जणांचा जागीच मृत्यू; शाळांना सुट्टी, नागरिकांना घरांतच राहण्याचे आवाहन

भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा जानेवारीत होणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. त्यावेळीच मशिदीची पायाभरणी मोदींनी करावी, अशी विनंती मुस्लीम समाजाकडून करण्यात आली आहे. इंडियन मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल अन्सारी म्हणाले, “आमचे पंतप्रधान एका शुभ मुहूर्तावर अयोध्येत येत आहेत. आम्ही त्यांना मशिदीचेही काम सुरू करण्याची विनंती करतो. ही आमची मनापासून इच्छा आहे.”

जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी आणि अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष डॉ. इलियासी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धन्नीपूर मशिदीची पायाभरणी करण्याची इंडियन मुस्लिम लीगचे कार्यवाहक प्रदेशाध्यक्ष नजमुल हसन गनी यांनी विनंती केली आहे.

विश्वस्तांमुळे काम रखडलं

बाबरी मशीद-राम मंदिर वादातील मुख्य याचिकाकर्त्यांपैकी एक असलेले इक्बाल अन्सारी यांनी इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या सदस्यांना मशिदीच्या बांधकामातील विलंबासाठी जबाबदार धरले. विश्वस्त चांगले असते तर आतापर्यंत काही कामे झाली असती. मशिदीच्या बांधकामात सरकारने सहकार्य करावे आणि विश्वस्तही बदलले पाहिजेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे आणि मंदिर ट्रस्टने मकर संक्रांती, १४ जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.