नवी दिल्ली : भाजपेतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, अगदी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते, अशा शब्दांत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी शरसंधान केले. तर हा मणिपूरवरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

भाजपेतर २६ पक्षांच्या ऐक्याच्या महाआघाडीला बेंगळूरूमध्ये झालेल्या बैठकीत ‘इंडियन नॅशनल डेव्हल्पमेंटल इनक्लुजिव्ह अलायन्स’ म्हणजेच ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. विरोधक स्वत:ला ‘इंडिया’ म्हणवून घेतले असले तरी या नामकरणाला काहीही अर्थ नाही. विरोधक कधीही इतके दिशाहीन झालेले मी पाहिले नाहीत. विरोधक वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही विरोधी बाकांवर बसायचे असावे, असे मोदी म्हणाल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व लोकसभेतील खासदार रवीशंकर प्रसाद यांनी दिली. २०२४ची लोकसभा निवडणूक जिंकून सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीला लागा, असा संदेश मोदींनी पक्षाच्या खासदारांना दिला. मणिपूरच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला नसल्याचे समजते. विरोधकांमुळे विचलित होऊ नका. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन मोदींनी पक्षाच्या खासदारांना केले. बहुसंख्य देशांनी भारताच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. म्हणूनच अमेरिका व फ्रान्ससारखे देश भारतासोबत करार करत आहेत. भाजप तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करेल व त्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान

विरोधकांचे प्रत्युत्तर मोदींनी सभागृहामध्ये मणिपूरवर भाष्य केले पाहिजे. मात्र इतक्या संवेदनशील मुद्दय़ाला बगल देत ते ‘ईस्ट इंडिया’वर बोलतात. मग, हिंदू महासभा, तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर, सावरकर यांची मते काय होती? ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडणारे कोण होते, या सगळय़ावरही बोलावे लागेल, असे प्रत्युत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिले. तर ‘मोदीजी, तुम्हाला हवे ते बोला. आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरला झालेली जखम भरून काढण्यासाठी मदत करू. आम्ही लोकांमधील प्रेमभावना व शांतता परत आणू आणि मणिपूरमध्ये भारत नावाच्या संकल्पनेची पुनर्बाधणी करू’, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले. ‘पंतप्रधान ‘इंडिया’ला एवढे का घाबरतात,’ असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी केला. यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन, महुआ मोइत्रा, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी पंतप्रधानांच्या या विधानावर तोफ डागली आहे.

‘इंडियन मुजाहिद्दीनच आठवली का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ इंडियन मुजाहिद्दीन, पीएफआय यांचीच आठवण झाली का, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर विचारण्यात आला आहे. इस्रो, एम्स, आयआयटी, आयआयएम, आयआयएससी, एनपीसीआयएल, आयएएस, आयपीएस, आयएफएस, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, आयटीबीपी.. एवढेच नव्हे, तर तुमचे स्वत:चे पद आठवले नाही. तुमचे मन काय विचार करू शकते, हे दिसून येते, अशा शब्दांत राजदने पंतप्रधानांच्या विधानावर तोफ डागली.

विरोधक पराभूत झाले असून त्यांच्यामध्ये लढण्याची ताकदही उरलेली नाही. त्यांना लोकसभा निवडणूक जिंकण्याची कोणतीही आशा नसून मोदींना विरोध करणे हा एकमेव अजेंडा ते राबवत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

इंडिया’ नावात काही अर्थ नाही तर, मोदी-भाजप इतके घाबरतात कशासाठी? काँग्रेस पक्ष नेहमीच ‘मदर इंडिया’ म्हणजेच ‘भारत माते’सोबत राहिला आहे. भाजपचे राजकीय पूर्वज मात्र इंग्रजांचे गुलाम होते.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

Story img Loader