गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल काल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अनेकजण बेपत्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उद्या(मंगळवार) मोरबी येथे जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही पाहा – PHOTOS: कोसळलेला पूल, अडकलेले लोक आणि मदतीसाठी आरडाओरड; गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेची डोळे पाणवणारी छायाचित्रे

रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही घटना घडली. या भागात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले नव्हते, असे समजते. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा : “वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंच विधान!

घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि बचावकार्याचा आढावा घेतला होता. याशिवाय पीडितांना तातडीने मदत पोहोचली पाहिजे, याची काळजी घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

मदतीची घोषणा –

मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.