पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन देशांच्या दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या देशांमध्ये मोदींचं मोठं स्वागत करण्यात आलं. विशेषत: पापुआ न्यू गिनी या देशात मोदी गेले असता विमानतळावरच त्या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे हे मोदींना सामोरे आले. त्यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर लागलीच मोदींनी त्यांना वर उठवत त्यांची गळाभेट घेतली. या सगळ्या घडामोडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे हेही चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेम्स मारापे यांनी मोदींच्या पाया पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मारापे यांच्यावरही टीका केली. त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचाही उल्लेख संजय राऊतांनी केला. या पार्श्वभूमीवर पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे नेमके आहेत तरी कोण? याची उत्सुकता आता दिसू लागली आहे.

कोण आहेत जेम्स मारापे?

१. जेम्स मारापे हे पापुआ न्यू गिनी या देशाचे आठवे पंतप्रधान आहेत. त्याआधी मारापे यांनी आधीच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

२. जेम्स मारापे (James Marape) हे २०१९ साली पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान झाले. पापुआतील PANGU या प्रमुख राजकीय पक्षाचं ते प्रतिनिधित्व करतात.

३. जेम्स मारापे यांनी १९९३ साली युनिव्हर्सिटी ऑफ पापुआ न्यू गिनीमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्च केली. त्यानंतर त्यांनी पर्यावरणशास्त्र विषयातील मानद पदवीही प्राप्त केली आहे. जेम्स मारापेंनी एमबीएचंही शिक्षण पूर्ण केलं आहे.

४. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान होण्याआधी जेम्स मारापे यांनी सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक या विभागांचे संसदीय सचिव म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या सरकारांमधील संबंधांवरच्या सल्लागार समितीवरही सदस्य म्हणून काम केलं आहे.

५. PANGU PATI या पक्षाकडून निवडणूक लढवण्यापूर्वी जेम्स मारापे २०१९ पर्यंत पापुआतील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत होतं.

६. २०२० मध्ये त्यांचं सरकार पाडण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून झाल्याचं सांगितलं जातं. विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव तिथल्या संसदेत आणला होता. मात्र, जेम्स मारापे यांनी तो जिंकत विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले.

पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्तानंतर कोणत्याही अतिथीचं स्वागत केलं जात नाही असं म्हटलं जातं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत मात्र जेम्स मारापे यांनी संध्याकाळी सूर्यास्तानंतर केल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देशाच्या परंपरेला छेद देऊन मोदींचं स्वागत केल्याचीही चर्चा आहे.