पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जानेवारी दरम्यान गुजरातचा दौरा करणार आहेत. या काळात ते ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद-२०२४’चे उद्घाटन करतील. या शिखर परिषदेदरम्यान मोदी जागतिक नेते, सर्वोच्च जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
‘व्हायब्रंट गुजरात’ विश्व परिषदेचे हे दहावे पर्व गुजरातमधील गांधीनगर येथे १० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान होणार आहे. ‘भविष्याचे प्रवेशद्वार’ (गेट वे टू द फ्युचर) असा त्याचा यंदाचा मुख्य विषय आहे. या वर्षी ३४ सहभागी देश आणि १६ भागीदार संस्था या परिषदेत सहभागी होत आहेत.

Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
cet dates will change due to schedule revised cbse class 12 exams
सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा

तंत्रज्ञान आणि नवकल्पना, शाश्वत उत्पादन, हरित हायड्रोजन ऊर्जा विनियोग, विजेवरील वाहने आणि अक्षय ऊर्जा आणि शाश्वतता यासारख्या जागतिक स्तरीय विषयांवर चर्चासत्र आणि परिषदांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या शिखर परिषदेत केले जाईल. ‘व्हीजीजीएस’मध्ये कंपन्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील. ई-वाहतूक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, सागरी अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा यावर प्रामुख्याने भर दिला जाईल.

हेही वाचा >>>बांगलादेशात कमी मतदान; विरोधी पक्षांच्या बहिष्काराचा फटका

या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यात जागतिक नेत्यांबरोबर चर्चा, अग्रगण्य जागतिक कंपन्यांच्या सीईओंबरोबर बैठक, ‘व्हायब्रंट गुजरात’ जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन, ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४’चे उद्घाटन, ‘गिफ्ट सिटी’मध्ये उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी चर्चा अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.

Story img Loader