लंडन : आपल्या ‘फोन हॅकिंग’च्या पहिल्या खटल्याच्या सुरुवातीलाच राजपुत्र हॅरी (डय़ूक ऑफ ससेक्स) यांनी विजय मिळवला असून, त्यांच्याबाबतचे वार्ताकन करताना बेकायदा माहिती मिळवल्याबद्दल ‘डेली मिरर’च्या प्रकाशकांनी माफी मागितली आहे. या गु्न्ह्यासाठी भरपाईची तरतूद आहे.

मिरर समूहाने बचावासाठी केलेल्या युक्तिवादात वरील बाब मान्य केली असली, तरी व्हॉइसमेलमध्ये ‘ऐतिहासिक’ व्यत्यय आणल्याबाबतच्या दाव्याबाबत आपण लढा देणार असून, हॅरी यांच्यासह इतर तीन फारशा प्रसिद्ध नसलेल्या सेलिब्रिटीजनी त्यांचे दावे मुदतीनंतर दाखल केल्याबाबत आपण सुनावणीत युक्तिवाद करू असे म्हटले आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

मात्र याचवेळी, काही तिसऱ्या पक्षांनी दावाकर्त्यांपैकी प्रत्येकाच्या यूआयजीच्या (अनलॉफुल इन्फर्मेशन गॅदिरग) साठी सूचना दिल्या याचा पुरावा आहे, असेही या समूहाने मान्य केले. यासाठी ‘भरपाई दिली जाऊ शकते’ असे समूहाने म्हटले असले तरी ती कुठल्या स्वरूपात असेल हे सांगितलेले नाही.

‘मिरर वृत्तसमूह यूआयजीच्या अशा सर्व प्रकारांसाठी माफी मागत असून, या कृत्याची पुनरावृत्ती होणार नाही याची सर्व दावाकर्त्यांना हमी देते’, असे समूहाने म्हटले आहे. राजपुत्र हॅरी  यांच्यासह इतर तिघांनी फोन हॅकिंगबाबतचे तीन दावे दाखल केले असून, गोपनीयतेवरील कथित आक्रमणासाठी ‘दि डेली मिरर’च्या माजी प्रकाशकांना न्यायालयात खेचले आहे. पहिल्या खटल्याची सुनावणी बुधवारी सुरू झाली. हे प्रकरण सुमारे दोन दशकांपूर्वीचे आहे, ज्या वेळी पत्रकार आणि गुप्तहेर राजघराण्याचे सदस्य, राजकीय नेते, खेळाडू, सेलिब्रिटीज आणि गुन्हेगार यांच्या खासगी गोष्टींमध्ये डोकावण्यासाठी व्हॉईसमेल अडवत असत. हे ‘हॅकिंग’ नंतर उघड झाल्यामुळे कंडय़ा पिकल्या होत्या. या प्रकरणात हॅरी हे जूनमध्ये स्वत: साक्ष देणे अपेक्षित असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.  राजपुत्र हॅरी यांनी कायदेशीर दाव्यांच्या माध्यमातून ब्रिटिश वृत्तपत्रांविरुद्ध शाब्दिक युद्ध छेडले आहे. माध्यमांना सुधारणे हे आपल्या जीवनाचे ध्येय असेल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. हीच माध्यमे आपली आई युवराज्ञी  डायना हिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.