झारखंड राज्यातील धनबाद येथे एका खासगी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता दहावीच्या मुलींनी ‘पेन डे’ निमित्त एकमेकींच्या शर्टवर संदेश लिहिला होता. मुख्याध्यापकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी ८० मुलींना शर्ट उतरविण्याची शिक्षा दिली. मुलींनी सदर कृत्याबाबत माफीही मागितली होती. मात्र त्याना विनाशर्ट फक्त ब्लेझरवर घरी जाण्यास भाग पाडण्यात आले. मुली विनाशर्ट फक्त ब्लेझरवर घरी आल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांना धक्काच बसला. यानंतर पालकांनी शाळेत धडक देत मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमके प्रकरण काय?

इयत्ता दहावीची परिक्षा झाल्यानंतर आता पुन्हा शाळेत एकत्र भेटता येणार नाही, यासाठी मुलींनी एकमेकींच्या शर्टवर निरोपाचा संदेश लिहून ती आठवण जतन करण्यासाठी ‘पेन डे’ साजरा केला. मात्र मुख्याध्यापकांना विद्यार्थींनींचा हा प्रकार आवडला नाही. शर्टवर संदेश लिहिलेल्या विद्यार्थींनींना त्यांनी थेट शर्ट काढण्याचे फर्मान सोडले. विद्यार्थींनींनी माफी मागूनही मुख्याध्यापकांचे समाधान झाले नाही.

हे वाचा >> एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

या घटनेनंतर आता धनबादमध्ये एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक आमदार रागिनी सिंह यांनी पालकांच्या नाराजीचे समर्थन केले. सदर घटना लाजिरवाणी आणि दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पालकांसह मिळून त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली. धनबादच्या पोलीस उपायुक्त माधवी मिश्रा म्हणाल्या की, काही पालकांच्या तक्रारी आमच्याकडे दाखल झाल्या आहेत. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तसेच एक समिती स्थापन करून याचा तपास सुरू आहे.

माधवी मिश्रा पुढे म्हणाल्या, समितीच्या निष्कर्षात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच शाळेच्या प्रशासनाशीही आम्ही चर्चा करत आहोत. त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शाळेचे हे लाजिरवाणे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.