फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांच्या कुटुंबीयांचे फेसबुक खातेही हॅकिंगपासून बचावू शकलेले नाही़  झुकेरबर्गच्या बहिणीने केवळ तिच्या मित्रांसाठी फेसबुकवर टाकलेले फोटो इतरांनीही पाहून ते ट्वीटरसारख्या संकेतस्थळावर शेअर केल्याचे उघडकीस आले आह़े  त्यामुळे फेसबुकवरील प्रायव्हसीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े  
 झुकेरबर्गची बहीण रॅण्डी हिने तिच्या प्रोफाईलवर स्वत:ची काही छायाचित्रे टाकली होती़  ही छायाचित्रे फेसबुकचे विपणन संचालक कॅली श्वेत्झर यांनी पाहिली आणि आपल्या ट्वीटर खात्यावर शेअर केली़  त्याचे बुधवारच्या दिवसात ४० हजार फॉलोव्हर झाल़े  वास्तविक रॅण्डीने आपली छायाचित्रे काही ठराविक मित्रांशीच शेअर केली होती़  परंतु, प्रायव्हसीची सेटिंग करूनही ती छायाचित्रे सर्वाना पाहाता येत होती़    

Story img Loader