मणिपूरच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज ( ८ ऑगस्ट ) लोकसभेत चर्चा झाली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जोरदार टीका केली. याला खासदार अरविंद सावंत यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाची बाजू घेत अरविद सावंत यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला.

“अरे बस्स खाली बस्स… आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. तुझी औकात नाही. मी तुझी औकात काढेल”, अशा शब्दांमध्ये नारायण राणेंनी अरविंद सावंतांना इशारा दिला. यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं. त्यांनी नारायण राणेंच्या संसदेतील भाषणाची एक क्लिप ट्विटरवर शेअर करत लिहिलं, “हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे दाखवताना दिसत आहे.”

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे संसदेच्या भाषणात म्हणाले, “अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना वाटलं की, दिल्लीत नाही, तर महाराष्ट्रातील विधानसभेत बसलोय, असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर बोलताना अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हिंदुत्वाबाबत भाष्य केलं. हिंदुत्वाबाबत एवढा गर्व होता, तर २०१९ साली भाजपाशी गद्दारी करून शरद पवार यांच्याबरोबर युती का केली? तेव्हा हिंदुत्व लक्षात आलं नाही का? हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सावंत बोलत आहेत. पण, ते शिवसेनेत कधी आले?”

हेही वाचा – VIDEO : गद्दारी, हिंदुत्व अन् शिवसेना; श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत आणि नारायण राणे लोकसभेत भिडले

“मी १९६६ पासूनचा शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडल्यावर २२० लोकांनी संरक्षण घेतलं होतं. आता जो आवाज येतोय तो मांजराचा आहे. वाघाचा आवाज नाही. पंतप्रधान मोदींवर बोलण्याची त्यांची लायकी नाही आहे. भाजपा, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या बोलल्यावर तुमची लायकी दाखवून देऊ,” असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

Story img Loader