पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये (२०१४ आणि २०१९) उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. आगामी लोकसभा निवडणूकही पंतप्रधान याच मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. तसेच नरेंद्र मोदींना वाराणसीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी टक्कर देऊ शकतात. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी यासंबंधी वक्तव्य केलं आहे. प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढतील आणि जिंकतील असा विश्वास चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी निवडून याव्यात यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल असंही चतुर्वेदी म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, आम्ही सगळे (इंडिया आघाडी) फ्रंट फूटवर खेळतोय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेपासून ते लाल किल्ल्यावरील भाषणापर्यंत सगळीकडेच केवळ इंडिया आघाडीवर टीका करत आहेत. त्यावरून समजतंय की पंतप्रधान अस्वस्थ आहेत. आम्ही सध्या २६ पक्ष एकत्र आलो आहोत. या २६ पक्षांचे जितके आमदार-खासदार आहेत त्या प्रमाणात मतदार आहेत. आम्ही एकत्र येऊन ही लढाई लढत आहोत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, प्रियांका गांधी या अमेठी, रायबरेली किंवा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार असतील तर मला वाटतं वाराणसीतली जनता त्यांना साथ देईल. प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढतील आणि जिंकतील.

हे ही वाचा >> “खुनाचा आरोप होताच, राज ठाकरे फरार”, स्वत:च सांगितला जुना प्रसंग, म्हणाले…

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, इंडिया आघाडीतले पक्ष एकत्र बसतील, चर्चा करतील. वेगवेगळ्या मतदार संघांबाबत चर्चा करतील. कुठल्या मतदार संघासाठी कोणता उमेदवार योग्य आहे यावर सगळ्यांची मतं घेतली जातील. जर वाराणसी मतदारसंघात प्रियांका गांधी यांचं गणित जमून आलं तर त्या वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढतील. इंडिया आघाडी ही प्रियांका गांधी यांना जिंकवण्यासाठी काम करेल आणि प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणूक जिंकतील.