Priyanka Chaturvedi on Mumbai Police Arrest Saif Ali Khan’s Attacker : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. दरोडेखोराने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले होते. या घटनेनंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होतं. तर, दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत होते. दोन दिवसांनंतर या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना यश आलं असून आज आरोपीला त्यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, बांगलादेशी घुसखोर आपल्या देशात घुसून एका कलाकारावर जीवघेणा हल्ला करतो हे पाहून विरोधी पक्षांमधील नेते केंद्र सरकारवर टीका करत आहे. केंद्र सरकार देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरल्याची टीका आता होऊ लागली आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. चतुर्वेदी म्हणाल्या, “देशाच्या सीमा इतक्या नाजूक करून ठेवल्या आहेत की बांगलादेशी केवळ बेकायदेशीरपणे या सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत नाहीत तर आपल्या देशात दहशत पसरवत आहेत, गुन्हे करत आहेत. ही देशाच्या गृहमंत्र्यांसाठी शरमेची बाब आहे. त्यांना सीमा ओलांडून भारतात प्रवेश करण्यास कोण मदत करतंय? इथे येऊन त्यांना शासकीय कागदपत्रं मिळवणं, नोकऱ्या मिळवणं आणि भयंकर गुन्हे करणं इतकं सोपं कसं काय? इतक्या सहजपणे बांगलादेशी भारतात या कारवाया कसे काय करतायत? इतर नेत्यांना देशद्रोही म्हणण्याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की स्थलांतर व घुसखोरी थांबवण्यात त्यांचं हे अपयश देशद्रोहाचंच कृत्य आहे”.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?

चतुर्वेदी म्हणाल्या, “केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारही अनेक पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे. राज्यात बेकायदेशीरपणे येणाऱ्या स्थलांतरितांना शोधणे, त्यांची ओळख पटवून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य कारवाई करण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरलं आहे. डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. गुप्तचर यंत्रणा व प्रशासनाचं हे मोठं अपयश आहे. ही घटना खूप लज्जास्पद आहे”.

आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव मोहोम्मद शरीफूल इस्लाम शहजाद असं आहे. तो ३० वर्षांचा आहे. हा आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी शिरला होता. त्याच दरम्यान ही घटना घडली. मोहोम्मदला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Story img Loader