राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन ५६ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना सोमवारी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना पद्मविभूषण, अभिनेत्री प्रियांका चोप्राला पद्मश्री तर सानिया मिर्झाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामोजी समूहाचे प्रमुख रामोजी राव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Story img Loader