उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पारा चढला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या मुलांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा आरोप केलाय. तसेच सरकारकडे दुसरं काम राहिलं नाही का? असा सवाल योगी सरकारला केलाय.

प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्या महिला सशक्तीकरण संमेलनावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या अभियानामुळे पंतप्रधान मोदींना महिलांसाठी काम करावं लागत आहे. पंतप्रधान महिला शक्तीसमोर झुकले आहेत. हा उत्तर प्रदेशमधील महिलांचा विजय आहे.”

हेही वाचा : ‘बलात्काराची मजा घ्या’ म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यावर प्रियंका गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अखिलेश यादव यांनी काय आरोप केले?

अखिलेश यादव यांनी देखील योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “आम्हा सर्वांचे फोन टॅप केले जात आहेत आणि आमचं बोलणं ऐकलं जातंय. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही फोन टॅपिंग ऐकत आहेत. पत्रकारांनी आम्हाला फोन केला तर तुमचे बोलणं देखील फोन टॅपिंगमधून ऐकलं जातंय.”

Story img Loader