Priyanka Gandhi on India vs Australia CWC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडले. या सामन्यात कुणाचा विजय होणार आणि कोण विश्वचषकावर नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशभरातील वातावरण क्रिकेटमय झालं आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता टीव्हीसमोर बसून सामन्यातील प्रत्येक अपडेट बघत आहे. अशातच देशातील काही राज्यांच्या निवडणुकाही होत असल्याने राजकीय प्रचार सभांचे फडही रंगले आहेत. अशाच एका सभेत आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याऐवजी सभेला यावं लागल्याने उपस्थितांची माफी मागितली.
प्रियांका गांधी म्हणाल्या, “आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. असं असूनही तुम्ही सर्व लोक मला ऐकण्यासाठी सभेला आला आहात. यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुम्हाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी सभेला यावं लागलं आणि त्रास झाला त्यासाठी मी माफी मागते.”
“भारतीय संघ आपल्या एकतेचं प्रतिक आहे”
“आपला क्रिकेट संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि विजयात मोठमोठे विक्रम निर्माण करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ आपल्या एकतेचं प्रतिक आहे. त्यात सर्व धर्मातील, सर्व प्रदेशांमधील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे खेळाडू आहेत. ते सर्व एकजुट होऊन आपल्या देशासाठी लढत आहेत,” असं मत प्रियांका गांधींनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “मोदी होते म्हणून गुगली पडली, मोदींनीच…”; क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना राऊतांची टोलेबाजी
व्हिडीओ पाहा :
“सर्वात आधी आपण भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करू”
“त्यामुळे आज इथं सभेत उभं राहून सर्वात आधी आपण भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करू. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट टीम इंडिया. माझ्याबरोबर बोला, ‘जितेगा इंडिया'”, असंही प्रियांका गांधींनी नमूद केलं.