Priyanka Gandhi Sports ‘Palestine’ Bag In Parliament : काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी सोमवारी संसदेत घेऊन आलेल्या बॅगची सध्या जोरदार चर्चा होत आहे. प्रियांका गांधी यांच्याकडील या बॅगवर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. प्रियांका गांधी याचा ही बॅग घेतलेला फोटो काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये प्रियांगा गांधी यांनी ही बॅग खांद्यावर अडकवलेली दिसत असून त्या हसताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका गांधी यांचा हा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेच यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी अशी बॅग संसदेत घेऊन जाणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

एका वापरकर्त्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) येथे पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला, त्या ‘विजय दिवस’च्या दिवशी हमाससारख्या संघटनेला पाठिंबा देणे योग्य नाही, असे एका एका वापरकर्त्याने म्हटले आहे. प्रियांका गांधी यांनी तत्काळ त्यांच्या सल्लागाराला काढून टाकले पाहिजे. आज भारतासाठी अत्यंत महत्वाचा विजय दिवस आहे. या दिवशी त्यांच्या आजीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. प्रियांका गांधी यांनी भारताच्या विजयाचे प्रतिक म्हणून काहीतरी घेऊन जाणे जास्त योग्य ठरले असते असेही या वापरकर्त्याने पुढे म्हटले आहे.

ही बॅग घेऊन जातानाचा प्रियांका गांधी यांचा व्हिडीओ आणि पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या बॅगचा फोटोदेखील समोर आला आहे.

प्रियाका गांधी यांच्या पॅलेस्टाईन बॅगचे काही जणांनी कौतुकदेखील केले आहे. शमा महोम्मद यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्यावर लोक लाईक आणि कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा>> Georgia : धक्कादायक! जॉर्जियातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळले १२ जणांचे मृतदेह; या घटनेमुळे उडाली खळबळ

प्रियांका गांधी संसदेत मांडला बांगलादेशचा मुद्दा

प्रियांका गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हणाल्या की, “मला पहिला मुद्दा हा मांडायचा आहे की या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा द्यावा…” .

यानंतर प्रियांका गांधी यांच्यावर भाजपाने मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप केला. यावर प्रियांकां गांधी यांनी लोकांना त्यांनी काय परिधान करावे आणि काय करू नये हे सांगणे पितृसत्तेचे उदाहरण असल्याचे म्हटले. तसेच माझा पितृसत्ताक पद्धतीवर विश्वास नाही त्यामुळे मी मला हवं ते मी परिधान करेन असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

पितृसत्तेच्या मुद्द्यावर भाजपाच्या आयची सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.

प्रियांका गांधी यांनी एक्सेसरीजच्या माध्यमातून भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एक आठवड्यापूर्वी प्रियांका गांधी या पीएम मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्या फोटो आणि ‘मोदी अदाणी भाई-भाई’ असा मजकूर लिहिलेली बॅग घेऊन आल्या होत्या.

नवी दिल्लीतील पॅलेस्टाईन दूतावासाचे प्रभारी आबेद एलराजेग अबू जॅझर यांनी प्रियांका गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन बेट घेत त्यांना वायनाड निवडणुकीतील विजयानंतर अभिनंदन केले होते. यानंतर प्रियांका गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती.

पॅलेस्टाईनमध्ये सध्या इस्त्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासने इस्त्राइलवर हल्ला केल्यानंतर युद्धाला तोंड फुटले होते. जवळपास हजार इस्त्रायली नागरिकांच्या हत्येनंतर इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टाईनमध्ये लष्करी मोहिमेला सुरूवात केली होती.

इस्त्राइलच्या लष्करी मोहिमेनंतर हजारो पॅलेस्टाईन नागरिकांचा गाझामध्ये या युद्धात मृत्यू झाला आहे. तर हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत.

हे युद्ध अजूनही सुरूच असून ते थांबवण्यासाठी अद्याप कुठलेही उपाय कामी येताना दिसत नाहीये. यु्द्धातील जीवितहानी आणि इतर विध्वंसपाहून जगभरातून पॅलेस्टाईनला समर्थन देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi bag written palestine in parliament bjp israel hamas war marathi news rak