Priyanka Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर तिथून प्रियंका गांधी यांनी पोटनिवडणूक लढवली होती. या निवडणुकीतील विजयानंतर प्रियंका गांधींचे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अशात प्रियंका गांधींनी हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजवल्याचे पाहायला मिळत आहे. १६ डिसेंबर रोजी प्रियंका गांधी यांनी हमास-इस्रायलमधील पॅलेस्टाईनच्या पीडितांच्या समर्थनार्थ ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिलेली बॅग आणली होती. यानंतर अनेकांनी खासदार प्रियंका गांधी यांचे कौतुक केले होते. तर, काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. आता अशात प्रियंका गांधी आजही संसदेत खांद्याला एक खास बॅग अडकवून आल्या होत्या. ज्यावर बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उभे राहा असे लिहिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका गांधीच्या बॅगवर काय?

आज मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संसद परिसरात काँग्रेस खासदारांनी बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचावर केंद्र सरकार काहीही बोलत नाही म्हणून आंदोलन केले. यावेळी प्रियंका गांधी यांच्या हातात “बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्यामागे उभे राहा” असे लिहिलेली बॅग होती. दरम्यान काँग्रेस खासदांच्या आंदोलनावेळी सर्वांच्या हातात ही खास बॅग दिसली.

परदेशातही प्रियंका गांधींची चर्चा

प्रियंका गांधी १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत जी बॅग घेऊन गेल्या होत्या, त्यावर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिलेले होते. या बॅगवर कापलेल्या कलिंगडाचेही चित्र होते. ज्याला पॅलेस्टीनी संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. खासदार प्रियंका गांधी यांनी सातत्याने पॅलेस्टाईन आणि गाझामधील पीडितांसाठी आवाज उठवला आहे. प्रियंका यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हाही इस्रायलला लक्ष्य केले होते. तसेच इस्रायलच्या पंतप्रधानांवरही टीका केली होती.

यानंतर पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी ‘नेहरूंची पणती’ असे म्हणत प्रियंका गांधींचे कौतुक केले होते. तसेच असे कोणतेही पाऊन न उसलणाऱ्या पाकिस्तानी खासदारांवर त्यांनी टीका केली होती.

एक देश एक निवडणुकीवरून संसदेत गोंधळ

देशात लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात यासाठी एक दे एक निवडणूक हे विधेयक आणले आहे. हे १२९ वे दुरुस्ती विधेयक केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आज लोकसभेत सादर केले. कायदा मंत्र्यांनी हे विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत मोठा गदारोळ झाल्याचे पाह्याला मिळाले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने या विधेयकाला विेरोध केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi carries bangladeshi hindu bag to parliament palestine aam