पीटीआय, जबलपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘२२० महिन्यांमध्ये २२५ घोटाळे आणि फक्त २१ सरकारी नोकऱ्या’ अशा तिखट शब्दांमध्ये भाजप सरकारवर टीका करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज्यात या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी चार ते पाच महिने आधीच काँग्रेसने प्रचार सुरू केला.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडालेले असून नोकऱ्या देण्यास अपयशी ठरल्याची टीका प्रियंका यांनी केली. व्यापम घोटाळा, स्वस्त धान्य वितरण, खाणकाम, इ-निविदा आणि करोनाविरोधातील लढाई या सर्वामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार दर महिन्याला एक नवीन घोटाळा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सभेआधी नर्मदा पूजन

सभेसाठी जबलपूरला जाण्याआधी प्रियंका गांधी यांनी ग्वारीघाट येथे नर्मदा नदीची पूजा केली. यावेळी मोठय़ा प्रमाणात हनुमानाचे कटआउट लावण्यात आले होते. प्रियंका यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, राज्याचे प्रभारी जे पी अग्रवाल आणि राज्यसभा खासदार विवेक तनखा हेही होते