तुम्ही शाळेत शिकवत नसून देशातील लोकांशी बोलत आहात. त्यामुळे स्वतः काय करणार ते सांगा, या शब्दांत प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्ला केला. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी सातत्याने आपल्या जाहीर सभांमधून मोदींना लक्ष्य करीत आहे. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून पुन्हा एकदा त्यांनी मोदींवर टीका केली. मोदींनी आपल्या मित्रांना स्वस्तात जमिनी दिल्या आहेत, हे सर्वसामान्य जनतेला माहिती असल्याचे सांगून गुजरात मॉडेलमध्ये तुम्ही शेतकऱयांसाठी काय केले असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Story img Loader