भोपाळ : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि रोख प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले. कमलनाथ गांधी कुटुंबावर दबाव आणून खोटय़ा घोषणा करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप चौहान यांनी केला.

चौहान म्हणाले की, याआधी गांधी घराण्याने सर्वांची फसवणूक केली होती. आता कमलनाथ गांधी घराण्याची फसवणूक करत आहेत. प्रियंका गांधी भाषण संपवून बसल्या असताना कमलनाथ यांनी काहीतरी सांगितल्यानंतर पुन्हा त्या उठल्या आणि आणखी महत्त्वाची घोषणा करते, असे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>> बेरोजगारी, ओबीसी ते आदिवासी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या केंद्रस्थानी ‘हे’ प्रमुख मुद्दे

प्रियंका यांनी  बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल, असे जाहीर केले होते. नंतर कमलनाथ यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची घोषणा केली अशी टीका चौहान यांनी केली.

काँग्रेसची पहिली यादी रविवारी?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या १३० उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ  यांच्यासह १५ माजी आमदार आणि जवळपास ९० विद्यमान आमदारांची नावे निश्चित केली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader