केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली जाते आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनीही या निर्णयावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रियांका गांधी वाड्रा यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मोदी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. ज्यांनी संविधानाच्या अंमलबजावणीला विरोध केला, तेच लोक आज संविधान हत्या दिन पाळणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
nana patole criticized shinde govt
Nana Patole : ‘महाराष्ट्र बंद’च्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “बगलबच्च्यांना न्यायालयात पाठवून…”
UPSC lateral entry
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?
kolkata rape case
Mamata Banerjee : “विरोधकांकडून राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न”; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जींनी सुनावलं!
sushma andhare
Sushma Andhare : “विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवले”, सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारवर आरोप; म्हणाल्या…
Mamata Banerjee role in doctor rape murder case Protests continue at hospitals
…तर सीबीआय तपासासाठी तयार! डॉक्टर बलात्कार, हत्याप्रकरणी ममता बॅनर्जींची भूमिका; रुग्णालयांमध्ये निदर्शने सुरूच
Kolkata doctor rape murder case
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचा पोलिसांना अल्टीमेटम; म्हणाल्या, “रविवारपर्यंत प्रकरण निकाली काढा, अन्यथा…”

हेही वाचा – “करुन दाखवलं”, तेलंगणातील शेतकऱ्यांचं ३१ हजार कोटींचं कर्ज माफ केल्यानंतर राहुल गांधींची खास पोस्ट

प्रियांका गांधी वाड्रा नेमकं काय म्हणाल्या?

भारतातील जनतेने ऐतिहासिक लढाई लढत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे ज्या लोकांना संविधानावर विश्वास आहे, ते नक्कीच संविधानाची रक्षा करतील, असे प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या. पुढे बोलताना, ज्या लोकांनी संविधानाच्या अंमलबजावणीला विरोध केला, संविधानाची समिक्षा करण्यासाठी आयोगाची स्थापना केली, संविधान रद्द करण्याचे आवाहन केलं, आणि आपल्या प्रत्येक कृतीतून सातत्याने संविधानावरून हल्ला केला, तेच लोक आज संविधान हत्या दिन पाळणार आहे. याचं आश्चर्य वाटायला नको, अशी टीकाही त्यांनी केली.

मल्लिकार्जून खरगेंचीही मोदी सरकारवर टीका

प्रियांका गांधी वाड्रा यांच्याव्यतिरीक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीदेखील मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने सातत्याने संविधानाची हत्या केली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – भारतीय राजकारणात आणखी एक ‘गांधी’! प्रियंका काँग्रेस आणि भारताच्या राजकारणात किती प्रभाव पाडतील?

सरकारकडून ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्याची घोषणा

दरम्यान, दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील एक्स पोस्ट करून माहिती दिली. “२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल.”, असं अमित शाह म्हणाले.