कांकेर : छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळाले तर बिहारप्रमाणेच या राज्यातही जातनिहाय जनगणना करण्यात येईल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील काँग्रेस सरकारच्या ‘पंचायत राज महासंमेलन’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास गरिबांसाठी दहा लाख घरे देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केंद्रातील भाजप सरकार श्रीमंतांसाठी आहे. या सरकारला गरीब आणि मध्यम वर्गाची कोणतीही चिंता नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.प्रियांका यांची ही घोषणा   इतर मागासवर्गीयांना आकर्षित करण्यासाठीचे मोठे पाऊल म्हणून समजण्यात येत आहे. या राज्यात सुमारे ४५ टक्के इतर मागासवर्गीय आहेत.