काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्याचा सहा महिन्यांचा कार्यक्रम प्रियंका यांनी आखला आहे.
प्रियंका गांधी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांनी गुरुवारी काँग्रेसच्या जिल्हा, ब्लॉक आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध निदर्शने करण्याच्या सूचना प्रियंका यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Story img Loader