प्रियांका गांधी यांच्यावर सोमवारी येथील खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. ४१ वर्षीय प्रियांका यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे गंगाराम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर प्रियांकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र रुग्णालयाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा आणि प्रियांकाच्या आई सोनिया गांधी तसेच भाऊ राहुल गांधी यांनी रुग्णालयात जाऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली. प्रियांकाची प्रकृती ठीक असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi undergoes surgery