उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराची सूत्रे प्रियांका गांधी सांभाळणार नसल्याचे मंगळवारी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. उत्तर प्रदेशमधील प्रचाराची धुरा प्रियांका यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचे काँग्रेसचे महासचिव आणि पक्षाचे उत्तर प्रदेशातील प्रभारी गुलाम नबी आजाद यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आता प्रियांका उत्तर प्रदेशात प्रचार करून काँग्रेसला नवसंजीवनी देणार, याबाबतच्या शक्यतांना पूर्णविराम आहे. प्रियांका यांच्याकडे प्रचाराची सूत्रे देण्यात येणार नसली तरी त्या प्रचारात सहभागी होऊ शकतात , असेही गुलाम नबी आजाद यांनी सांगितले. याऐवजी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून शीला दीक्षित यांचे नाव आघाडीवर आहे. शीला दीक्षित यापूर्वी उत्तर प्रदेशातून खासदार राहिल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्या पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडतील, असेही गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

Story img Loader