आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी आढळल्याचे ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल एनसीबीच्या ब्युरो प्रमुखांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात ‘सिलेक्टिव्ह ट्रिटमेंट’ देण्यात आल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO : NCB नं क्लीनचीट दिली अन् पुन्हा पार्टीमध्ये मग्न झाला आर्यन खान? व्हिडीओ व्हायरल

एनसीबीच्या या अहवालात सतर्कतेच्या मुद्द्यावरुन आठ अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये सध्या सेवेत असलेले अधिकारी, होम कॅडरमध्ये परतणाऱ्या अधिकाऱ्यांसह ब्युरोमध्ये सध्या कार्यरत नसलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. या तपासादरम्यान ६५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली, त्यावेळी मुंबई झोनचे विभागीय संचालक समीर वानखेडे होते. या प्रकरणात वानखेडेंनी केलेल्या तपासावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

मुलाच्या पदार्पणासाठी शाहरुख घेतोय मेहनत; या लोकप्रिय लेखकाला प्रशिक्षक म्हणून नेमल्याची चर्चा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण काय होतं?

मुंबईहून गोवा जाणाऱ्या क्रूजवरून आर्यन खानला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (NCB) ऑक्टोबर २०२१ मध्ये अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणात आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता. या प्रकरणात आर्यन खानला एनसीबीनं क्लिन चीट दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Procedural lapses were found in the probe of aryan khan drugs case revealed in narcotics control bureau report rvs
First published on: 18-10-2022 at 22:17 IST