पीटीआय, नवी दिल्ली : उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. सिसोदिया यांना सोमवारी न्यायालयापुढे हजर करावे, असे निर्देश विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांनी शनिवारी सीबीआयला दिले. तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर सीबीआयने शनिवारी सिसोदिया यांना न्यायालयापुढे हजर करून आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘कोठडीत मानसिक छळ’
सीबीआय कोठडीदरम्यान आठ ते नऊ तास चौकशीसाठी बसवून ठेवले जाते. त्यात वारंवार तेच प्रश्न विचारले जात असून, आपला मानसिक छळ होत असल्याचे सिसोदिया यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर, सीबीबायने त्यांना वारंवार तेच प्रश्न विचारू नयेत, अशी सूचना न्यायालयाने केली.
First published on: 05-03-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Product fee in case of corruption manish sisodia cbi custody extended by 2 days ysh