क्लोिनग तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या मदतीने गर्भाच्या स्कंदपेशी (मूलपेशी) तयार करून मधुमेह झालेल्या महिलेची जनुके वेगळी काढून त्यात इन्शुलिन निर्माण करणाऱ्या बिटा पेशी घालण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून त्यातून मधुमेहावर अत्यंत प्रभावी उपचार करता येणे शक्य आहे.
संशोधकांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान सध्या व्यक्तिगत मूलपेशींसाठी उपयोगी आहे, पण जैवनीतिशास्त्रज्ञांनी गर्भाचे क्लोन करण्यास आक्षेप घेतला आहे. ‘नेचर’ या  नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे संशोधन न्यूयॉर्क स्टेम सेल फाउंडेशनने केले असून या संस्थेचे डायटर एगली यांनी सांगितले की, जनुकीय पातळीवर मधुमेह बरा करण्याच्या दिशने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. एगली व त्यांच्या चमूने  एका महिलेच्या त्वचेतील केंद्रक काढून ते मानवी अंडपेशीत टाकले, त्यामुळे मूलपेशी तयार झाल्या, त्यातून पुढे बिटा पेशी तयार झाल्या. याचा परिणाम म्हणून मधुमेही रूग्णाच्या रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर बिटा पेशी इन्शुलिन सोडतात, त्यामुळे क्लोिनग तंत्र वापरून बिटा पेशी तयार केल्या हे एक फार मोठे यश मानले जात आहे.
 हे करताना तयार झालेली नवीन पेशी सुरक्षितपणे रूग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्याच्या तंत्राची खातरजमाही करण्यात आली आहे. स्कंदपेशी किंवा मूलपेशी अशा प्रकारे पहिल्यांदाच तयार करण्यात आल्या अशातला भाग नाही. परंतु रूग्णाच्या शरीरातील पेशींपासून मूलपेशी तयार करणे व नंतर त्याचा उपयोग मधुमेहासारखा रोग बरा करण्यासाठी करणे हा त्यातील नवीन भाग आहे.
क्लेव्हलँडच्या स्कूल ऑफ मेडिसीनचे जैवनीतिशास्त्रज्ञ इन्सूयू यांनी सांगितले की, गर्भाच्या मूलपेशींमध्ये जिवंत माणसाचा जिनोम असतो. त्यामुळे अशा प्रकारे वारंवार क्लोिनग केल्याने व प्रौढांच्या पेशी त्यासाठी घेतल्याने केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित उपचारपद्धती तयार होईल, ही या संशोधनाची मर्यादा आहे असे ते लिहितात.
क्लोिनग करताना रूग्णाच्या त्वचा पेशीतील केंद्रक काढून ते मानवी अंडपेशीच्या केंद्रकाजागी लावून पेशींची वाढ केली जाते. याचा अर्थ त्वचापेशीच्या केंद्रकाबरोबर त्याचा डीएनए येतो व हे सगळे प्रयोगशाळेत वाढवले जाते. त्यासाठी त्यांना विद्युत झटके दिले जातात व त्यामुळे पेशी विभाजन होऊन ब्लास्टिप्लास्ट तयार होते व तीच गर्भाची पूर्वावस्था असते. त्यातून दात्याचा डीएनए असलेल्या किमान दीडशे पेशी तयार होतात.
 याच तंत्राने पहिली क्लोिनग केलेली डॉली ही मेंढी तयार करण्यात आली होती. त्यामुळे गर्भपेशींपासून मूलपेशी मिळवणे व त्या वापरणे हे आक्षेपार्ह आहे. अनेक देशात सोमॅटिक स्ले न्युक्लीयर ट्रान्सफर या क्लोिनग तंत्राला बंदी आहे. अमेरिकी व इस्रायली वैज्ञानिकांच्या मते त्यांनी पेशी वाढवताना वापरावयाच्या रसायनांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळेच बिटा पेशींसह काही प्रौढ पेशी तयार होऊ शकल्या. निष्कर्ष पाहिले तर आपण बिटा पेशींवर आधारित उपचार शोधून काढू शकू, असा विश्वास एनवायएससीएफच्या मुख्य कायर्कारी अधिकारी सुसान सोलोमन यांनी व्यक्त केला.
काहींच्या मते या तंत्राने तयार केलेल्या बिटा पेशींचे प्रत्यारोपण करता येणार नाही; पण तो दावा वैज्ञानिकांनी फेटाळला आहे. मधुमेहात प्रतिकारशक्ती प्रणाली बिटा पेशींवर हल्ला करते, त्यामुळे बिटा पेशींचे संरक्षण कसे करायचे या मार्गाने संशोधन अजून सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा