बॉलिवूड अभिनेता तथा प्रसिद्ध हास्यकलाकार वीर दासचा बंगळुरु येथील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. खुद्द वीर दासने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तशी माहिती दिली आहे. आज (१० नोव्हेंबर) बंगळुरूमधील मल्लमेश्वरम येथील चौडिया मेमोरियल हॉलमध्ये वीर दासचा कार्यक्रम होणार होता. मात्र उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘काही अपरिहार्य परिस्थितीमुळे आजचा कार्यक्रम होणार नाही. लवकरच या कार्यक्रमाची नवी वेळ आणि तरीख सांगण्यात येईल,’ असे वीर दासने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे. वीर दासने त्याच्या चाहत्यांची माफीदेखील मागितली आहे.
हेही वाचा >>> मातोश्रीवर पोहोचताच संजय राऊतांचे जंगी स्वागत, स्वागतासाठी गेटवर उभ्या आदित्य ठाकरेंनी घेतली गळाभेट
वीर दासच्या कार्यक्रमला विरोध करत हिंदू जनजागृती समितीने व्यालिकवल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. “याआधी वीर दासने अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील एका कार्यक्रमात भारतातील महिलांबद्दल अपमानास्पद विधान केलेले आहे. त्यासोबतच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाविषयीही चुकीची विधाने केली आहेत. भारतात दिवसा महिलांची पूजा केली जाते. तर रात्री महिलांवर बलात्कार केला जातो, असे वीर दास त्याच्या कार्यक्रमात म्हणाला होता,” असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते मोहन गौडा यांनी केला आहे.
हेही वाचा >>> जामिनावर सुटताच संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक, म्हणाले “लवकरच देवेंद्र फडणवीसांची…”
बंगळुरू हा भाग सामाजिक दृष्टीकोनातून संवेदनशील आहे. अशा ठिकाणी वीर दासच्या कार्यक्रमाचे आयोजन करणेय योग्य नाही, असे मत हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केले आहे. “कर्नाटक राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत. त्यात वीर दासच्या कार्यक्रमामुळे वातवरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये. वीर दासचा कार्यक्रम तत्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे,” असे मोहन गौडा म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> धार्मिक भावना दुखावल्याचा वीर दासवर आरोप; नवा कार्यक्रम रद्द करण्याची हिंदू संघटनेची मागणी
वीर दास अमेरिकेतील कार्यक्रमात काय म्हणाला होता?
“मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो,” असे वीर दास अमेरिकेत एका कार्यक्रमात म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेता वीर दासने अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलेले आहे. प्रामुख्याने तो विनोदी भूमिका साकारताना दिसतो.