गोरखपूर: गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जी वाटचाल केली आहे, जगभरात त्याचा गौरव होत आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. गीता प्रेसच्या शताब्दी समारोप सोहळय़ात योगींनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. गीता प्रेसच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करत, त्यांना मिळालेला गांधी शांतता पुरस्कार हा प्रत्येक भारतीय वारशाचा गौरव असल्याचे योगींनी नमूद केले. जगात एक शक्ती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हणून भारताचा उदय होत आहे. त्याचे श्रेय पंतप्रधानांचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. नव्या भारताचे शिल्पकार अशा शब्दात योगींनी पंतप्रधानांचे वर्णन केले. योगाला मोदींनी जागतिक ओळख दिली, जगभरात मोदींची लोकप्रियता तेथील राष्ट्रप्रमुखांनी केलेल्या स्वागतावरून दिसून येते, असे ते म्हणाले. गोरखपूरच्या विकासाचा उल्लेख करत, येथे तीस वर्ष बंद असलेला खत कारखाना सुरू करण्यात आला. दैनंदिनी क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन तेथे सुरू  असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. एम्समध्ये पूर्व तसेच पश्चिम उत्तर प्रदेश तसेच नेपाळमधील नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचे योगींनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Progress of the country under the leadership of narendra modi yogi adityanath ysh