पीटीआय, मथुरा (उत्तर प्रदेश)
हिंदू समाजातील जात आणि विचारसरणीच्या आधारे फूट पाडणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा देतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी लोककल्याणासाठी हिंदू ऐक्यावर भर दिला. बांगलादेशातील हिंदू समाजाच्या विद्यमान परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना तेथील हिंदूंचे संरक्षण सुनिश्चित करण्याची गरज प्रतिपादित केली तसेच तेथील हिंदूंनी भारतात स्थलांतर करू नये, असे आवाहनदेखील केले.

ते उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी परिषदेच्या समारोपप्रंगी संबोधित करीत होते.

हेही वाचा : Bengaluru Man Post : बंगळुरुतील माणसाच्या कूककडे आहे स्वतःचा स्वयंपाकी, सोशल मीडियावर ‘या’ चर्चांना उधाण

ओटीटी प्लॅटफॉर्मवर कायदेशीर नियमन करण्याची गरज असल्याचेही होसाबळे म्हणाले. चित्रपटांप्रमाणे ओटीटीसाठीदेखील असे मंडळ असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. बांगलादेश एक शक्तिपीठदेखील आहे. तेथील अल्पसंख्यकांचे संरक्षण सुनिश्चित केले पाहिजे.

दत्तात्रेय होसबाळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ