पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा धडाक्यात सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसच्या बाहेर आणि त्यानंतर अमेरिकेच्या संसदेत भाषणही केलं. तसंच जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही महत्त्वाची मानली जाते आहे. अशात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी जो बायडेन यांना दिलेला सल्ला लक्षवेधी ठरतो आहे. बराक ओबामा यांनी CNN ला एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी भारतातील मुस्लिम सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

काय म्हटलं आहे बराक ओबामांनी?

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भारतातील मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र भारतात मुस्लिम समुदायाची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. भारत हा हिंदू बहुसंख्यांचा देश आहे. मात्र तिथल्या मुस्लिम अल्पसंख्यांकांची सुरक्षा हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. जर माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली असती तर मी त्यांच्याशी हा विषय बोललो असतो. जर अल्पसंख्याकांची सुरक्षा हा मुद्दा पाहिला गेला नाही तर भविष्यात भारतात दोन समुदांमधली फूट वाढू शकते. हे भारताच्या राष्ट्रहिताच्या विरोधात असेल”

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं सोपं नाही

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं ही सोपी बाब नाही. मी जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो तेव्हा मी लोकांना भेटत होतो. मी लोकांशी चर्चा करत होतो. त्यांना मी विचारत असे की आपलं सरकार, आपला पक्ष हा लोकशाही पाळतो आहे हे तुम्हाला वाटतं का? अनेकदा या प्रश्नाचं उत्तर लोक नाही असंही द्यायचे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला या आणि अशा अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात. यामध्ये वित्तीय मुद्देही समाविष्ट आहेत. पॅरीसच्या करारासाठी मी मोदी आणि चीन दोहोंशी चर्चा केली होती.

हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद होणं, दोन्ही समुदायांमध्ये भांडणं होऊ लागली, त्यांच्यातली फूट वाढली तर ते फक्त मुस्लिम हितांच्या आणि हिंदू हितांच्याही विरोधात आहे.

भारतामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या संरक्षणाच्या मुद्दय़ावर चर्चा व्हायला हवी, असे मत बायडेन यांचे स्वपक्षीय नेते आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. मोदी यांच्याशी चर्चा करताना हा मुद्दाही घ्यावा, असा सल्ला मोदी-बायडेन भेटीपूर्वी ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबामा यांनी दिला. मोदी यांच्याशी भेट झाली असती तर अल्पसंख्याकांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला असता, असेही ते म्हणाले.