ओलांद यांचे ब्रिटिश खासदारांना आवाहन

सीरियातील इस्लामिक स्टेटवर हवाई हल्ले चढवण्याच्या कारवाईत आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी ब्रिटिश खासदारांना केले आहे.
सीरियातील जिहादी गटांवर फ्रान्स करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ब्रिटनने सहभागी व्हावे, याबाबत ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी खासदारांपुढे आपले म्हणणे मांडले असून, या मुद्दय़ावर पुढील आठवडय़ात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मतदान होण्याची अपेक्षा आहे. दोन आठवडय़ांपूर्वी आयसिसने पॅरिसमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर या मुद्दय़ाला होणारा विरोध कमजोर होत आहे.
सीरियातील हवाई हल्ल्यांमध्ये भाग घेण्याबाबत आपण संसदेशी विचारविनिमय करणार असल्याचे कॅमेरून यांनी मला सांगितले आहे. यासाठ ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे मन वळवण्याची त्यांना खात्री आहे, असे ओलांद यांनी माल्टा येथील राष्ट्रकुल परिषदस्थळी वृत्तसंस्थेला सांगितले.
पुढील आठवडय़ात होणाऱ्या मतदानासाठी संख्याबळ तोडीचे असले, तरी खासदारांची या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची तयारी दिसते आहे. तसे झाल्यास काही दिवसातच ब्रिटनचे सीरियावर हल्ले सुरू होतील. मात्र, ब्रिटनमधील नागरिकांनी शनिवारी हवाई हल्ले करण्याविरोधता निदर्शने करून आपला विरोध दर्शवला.

Story img Loader