एमबीबीएस अभ्यासक्रमाचा कालावधी साडेपाच वर्षांहून साडेसहा वष्रे केल्याने नवी दिल्लीतील वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय विद्यार्थी गुरुवारीपासून बेमुदत संपावर गेले. अभ्यासक्रमाच्या या नव्या संरचनेचा केंद्र सरकारने फेरविचार करावा आणि त्यात बदल करावा, अशी डॉक्टरांची मागणी आहे.
रुग्णांना या संपाचा त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयांमधील आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत, मात्र ओपीडी बंद असतील, असे डॉक्टरांनी सांगितले. एम्ससह अनेक महत्त्वाच्या रुग्णालयांमधील डॉक्टर संपात सहभागी झाल्याने वैद्यकीय सुविधेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निर्माण भवन येथे आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी या डॉक्टरांनी निदर्शने केली.
आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी या डॉक्टरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आम्ही येथे आलो नाही, तर आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निदर्शने करत आहोत, असे या डॉक्टरांनी सांगितले.
एमबीबीएसचा अभ्यास पूर्वी साडेपाच वष्रे होता, मात्र आरोग्य मंत्रालयाने त्यात एक वर्षांची वाढ केली आहे. ग्रामीण भागात एक वर्षांची वैद्यकीय सेवा करणे डॉक्टरांना अनिवार्य केल्याने अभ्यासक्रमाचा कालावधी वाढला आहे. डॉक्टरांचा याला विरोध असून, अभ्यासक्रमाच्या या संरचनेत बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा