पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोरील आव्हाने कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालानुसार महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्य़ांच्या संख्येचा विचार करता देशात बंगाल आघाडीवर आहे. तर दुसरीकडे, कामधुनी गावातील महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या बलात्कारानंतर, ममतांनी बलात्कार हे आपल्याविरोधात कम्युनिस्टांनी रचलेले षडयंत्र असल्याचा केलेला आरोप या कात्रीत त्या स्वतच अडकल्या आहेत. मोठय़ा आशेने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर आता ‘सिव्हिल सोसायटी’ आणि बुद्धिजीवी वर्गही ममतांपासून दुरावल्याची चिन्हे आहेत.
बंगालमध्ये ममतांविरोधात प्रक्षोभ
पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोरील आव्हाने कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालानुसार महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्य़ांच्या संख्येचा विचार करता देशात बंगाल आघाडीवर आहे.
First published on: 24-06-2013 at 07:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against mamata