Indian Diaspora Vs Pro-Khalistan Mob Video : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनची राजधानी लंडन येथे राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे प्रजासत्ताक दिनी भरत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या खलिस्तान समर्थकांना भारतीय समुदायाकडून जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. यापूर्वी कॅनडा येथे देखील असाच प्रकार समोर आला होता. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड चित्रपट इमर्जन्सीविरोधात देखील खलिस्तान समर्थकांनी चित्रपटगृहात घुसून राडा घातल्याच्या घटना घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना खलिस्तान समर्थकांनी भारतीय दूतावासाबाहेर एकत्र गोळा होत, भारत सरकारविरोधात आंदोलन केलं. यावेळी खलिस्तान समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी भारत सरकारच्या धोरणांवर टिका केली, यावेळी पंजाबमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत अल्पसंख्यांक समुदायांना वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप खलिस्तान समर्थकांनी केली.

यानंतर भारतीय समर्थकांनी भारतीय तिरंगा फडकवत तसेच ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ सारख्या देशभक्तीपर घोषणा देत खलिस्तान समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या दोन्ही गटांना वेगळे ठेवण्यासाठी, तसेच कोणत्याही प्रकारच्या हिंसाचार रोखण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी आंदोलन करणाऱ्या खलिस्तान समर्थकांकडून भारत सरकारवर शीख समाजाचा आवाज दाबल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपची मागणी करण्यात आली. तर भारत समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले आणि असे आंदोलन हे भारत देशाची एकता आणि लोकशाही मूल्य साजरे कारणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचा अवमान असल्याचे मत व्यक्त केले.

लंडन येथील उच्चायुक्तालयातील एका भारतीय समर्थकांने एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, “…आम्ही येथे ७६ व्या प्रजासत्ताद दिन सोहळ्यासाठी आलो होतो. ध्वजारोहणानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्ही पाहिले की काही खलिस्तानी आंदोलक राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहेत. पण आमचे त्यांना एकच सांगणे आहे की, तुम्ही हे जे काही करत आहात त्यामुळे आम्हाला किंवा आमच्या देशाला काही फरक पडणार नाही…”.

दुसरा एक समर्थक म्हणाला की, ” ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त आम्ही भारतीय उच्चायुक्तालयात ध्वजारोहणासाठी आलो होतो. आम्ही काही खलिस्तानी गोळा झाल्याचे पाहिले आणि ते राष्ट्रध्वजाचा अपमान करत होते. मला त्यांना फक्त इतकं सांगायचं आहे की, त्यांच्या या कृतीचा आमच्यावर किंवा आमच्या देशावर काही परिणाम होणार नाही. सध्या आम्ही कमी संख्यने आहोत पण आमच्यात त्यांच्यापेक्षा जास्त उत्साह आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू”.