क्षी जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सध्या चीनमध्ये आंदोलन सुरु आहे. राजधानी बिजिंगमध्ये झळकावण्यात आलेलं एक पोस्टर यासाठी कारणीभूत ठरलं. या पोस्टरमध्ये क्षी जिनपिंग यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. कडक लॉकडाउन आणि निर्बंधांचा या पोस्टरमधून निषेध करण्यात आला होता. यानंतर संपूर्ण चीनमध्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये हे आंदोलन पसरलं आहे.

चीनमध्ये आंदोलन

‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, VoiceofCN हा लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या अज्ञात चिनी नागरिकांचा एक गट असून त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. यामधून त्यांनी जवळपास आठ शहरांमध्ये आंदोलन सुरु असून जिनपिंग यांना हटवण्याची मागणी होत असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये राजधानी बिजिंगसह, हाँगकाँगचाही समावेश आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात सुरु असलेल्या घोषणाबाजीचे अनेक फोटो, व्हिडीओ VoiceofCN कडे येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, यामधील अनेक घोषणा बाथरुममध्ये लिहिण्यात आल्या असून काही शाळेतील सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये सार्वजनिक ठिकाणी असणारी सुरक्षा तसंच सीसीटीव्हींमुळे बाथरुम हे आंदोलनाचं मुख्य केंद्र ठरत आहे. बिजिंगमधील China Film Archive Art Cinema च्या बाथरुममध्ये ‘हुकूमशाही नाकारा’ असं आवाहन करण्यात आलं होतं.

जगभरात पसरलं आहे आंदोलन

चीनमधील आंदोलन फक्त देशापुरतं मर्यादित राहिलेलं नसून अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि इतर ठिकाणीही पोहोचलं आहे. २०० हून अधिक विद्यापीठांमध्ये या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. इतके दिवस सरकारने आणि त्यांच्या सेन्सॉरशिप यंत्रणेने दाबलेला आवाज आता संतापाच्या माध्यमातून बाहेर येत असल्याचं VoiceofCN ने म्हटलं आहे.

आंदोलनांवर बंदी

चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात जाहीरपणे आंदोलन केल्यास तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. बिजिंगमधील ब्रीजवर पोस्टर झळकावण्यात आल्यानंतर सरकारने संबंधित व्हिडीओ आणि शब्दांवर बंदी घातली आहे. देशभरातील इंटरनेटवर या शब्दांवर बंदी आहे. ‘Beijing protester’ ‘Sitong bridge’ हे शब्द सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काढण्यात आले आहेत. ‘bridge’ ‘courage’ ‘hero’ या शब्दांरवही बंदी असल्याचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.

Story img Loader