पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीमध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा निदर्शने करण्यात आली. त्यानंतर, राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. 

शुक्रवारी सकाळी संतप्त स्थानिकांनी संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखच्या मालमत्तेला आग लावली. तसेच तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या घरांचीही जमावाने तोडफोड केली. संदेशखालीच्या बेलमाजूर भागातील एका मासेमारी यार्डाजवळील खळय़ाला आंदोलकांनी आग लावली. तृणमूलचा फरार नेता शाहजहान शेख आणि त्याचा भाऊ सिराज यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. हे खळे सिराजचे असल्याचे समोर आले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस महासंचालकांनी दिला. 

हेही वाचा >>>“वाराणसीत तरुणांना नशेत नाचताना पाहिलं”, राहुल गांधीच्या टीकेवर मोदींचा पलटवार; म्हणाले, “जे स्वतः…”

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने संदेशखलीला जाऊन महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत तेथील ग्रामस्थांचे जबाब नोंदवले. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावून संदेशखालीतील हिंसाचाराचा चार आठवडय़ांत अहवाल मागवल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.

शेखच्या साथीदारांच्या घरांवर ईडीचे छापे

फसवणूक करून जमीन हडपण्याच्या एका जुन्या प्रकरणाच्या संदर्भात ईडीने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचा फरारी नेता शाहजहान शेख याच्या सहकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. हावडा, विजयगड आणि बिराटीसह पाच ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.