कर्नाटक मंत्रिमंडळात काँग्रेसच्या ज्या नेत्यांना स्थान मिळाले नाही त्यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी शनिवारी आपली नाराजी अनेक ठिकाणी निदर्शने करून व्यक्त केली.
जिल्हा मुख्यालयाचे शहर असलेल्या यादगीर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाची मोडतोड करून दोन खिडक्यांना आग लावली. ज्येष्ठ नेते ए. बी. मलाका रेड्डी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली नाही, त्याचा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामनगर आणि मंडय़ा येथेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची मागणी त्यांनी केली. तर मैसूरमध्ये तनवीर सैत यांच्या समर्थकाने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. तेथे कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली.
कर्नाटक विधान परिषदेतील किमान पाच सदस्यांना मंत्रिपद द्यावयास हवे होते, असे कर्नाटक विधान परिषदेतील आमदार वीरण्णा मथीकट्टी यांचे म्हणणे आहे. विधान परिषदेतील कोणत्याही सदस्याची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आलेली नाही.
कर्नाटकमधील अनेक जिल्ह्य़ांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही त्यामुळे तेथील काँग्रेसजनांमध्ये उघड नाराजी आहे.
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने कर्नाटकमध्ये जोरदार निदर्शने
कर्नाटक मंत्रिमंडळात काँग्रेसच्या ज्या नेत्यांना स्थान मिळाले नाही त्यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी शनिवारी आपली नाराजी अनेक ठिकाणी निदर्शने करून व्यक्त केली. जिल्हा मुख्यालयाचे शहर असलेल्या यादगीर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाची मोडतोड करून दोन खिडक्यांना आग लावली.
First published on: 18-05-2013 at 05:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protests in parts of karnataka over denial of ministership