नवी दिल्ली : ‘तुमच्या मोबाइल फोनवर पेगॅसस असल्याचे पुरावे सादर करा, लोकसभेचा वापर वाट्टेल ते आरोप करण्यासाठी करू नका’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांना खडसावले. ‘देशासमोरील अमली पदार्थाचा धोका’ या विषयावरील अल्पकालीन चर्चेत बोलताना काँग्रेसचे खासदार गोगोई यांनी पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून देशातील राजकीय नेत्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला.

जल, वायू आणि भूमार्गाने देशात होणारी अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या सुरक्षा व देखरेख यंत्रणा व्यवस्था तैनात केल्या आहेत, देशाच्या सीमांवर गस्त वाढवण्यासाठी कोणते उपाय केले आहेत, असे सवाल गोगोई यांनी केले. हा मुद्दा मांडताना गोगोई यांनी, पेगॅसस या इस्रायल बनावटीच्या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरचा देशात गैरवापर केला जात असून राजकीय नेते, पत्रकारांवर पाळत ठेवली जाते. मग, पेगॅससच्या आधारे केंद्राने किती अमली पदार्थाचे तस्कर पकडले, असा तिरकस प्रश्न विचारला. गोगोई यांच्या विधानावर शहा यांनी आक्षेप घेतला. सभागृहात गोगोई अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. पेगॅससचा वापर करून गोगोई यांचा मोबाइल फोन हॅक झाला असेल तर, त्याचा पुरावा सभागृहात सादर करावा. नसेल तर वाट्टेल ते आरोप करू नका, असे शहा म्हणाले.

bhosari assembly constituency Election 2024 Latest News
भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
sanjay raut on dadar mahim amit thackeray
Sanjay Raut : अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”
riteish and genelia deshmukh
दिवाळी पार्टीत रितेश देशमुखच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, बायकोसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “Green Flag…”
PM Modi Russia Visit : '
PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण

राजकारण नको, बिगरभाजप राज्यांना आवाहन

सीमांची सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी आहे. पण, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकारांचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा राज्ये अधिकारांवर गदा येत असल्याची ओरड करतात. पण, ‘बीएसएफ’ला राज्यांमध्ये काम करू दिले नाही तर, अमली पदार्थविरोधी मोहीम यशस्वी कशी होणार? ‘बीएसएफ’ने अमली पदार्थ जप्त केले पण, त्यांना गुन्हा नोंदवता आला नाही तर, त्यांच्या कारवाईला अर्थ उरणार नाही. अमली पदार्थविरोधी मोहिमेचे राजकारण करू नका. सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवा, असे आवाहन शहा यांनी बिगरभाजप राज्य सरकारांना केले.