मद्याच्या दुकानांवर गर्दी उसळत असल्याने टाळेबंदीच्या काळात थेट संपर्काशिवायकिंवा ऑनलाईन विक्री आणि घरपोच सेवा या पर्यायांचा विचार करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारांना केली.
टाळेबंदीच्या काळात मद्याच्या थेट विक्रीला परवानगी देणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाने १ मे रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्या. अशोक भूषण, संजय किशन कौल आणि बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने दूरचित्रसंवादाद्वारे सुनावणी घेतली. मद्याची ऑनलाईन विक्री किंवा घरपोच सेवा देण्याबाबत आधीच चर्चा सुरू असल्याचे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आणले. मद्यखरेदीसाठी उसळणारी गर्दी आणि करोनाच्या फैलावाचा धोका लक्षात घेऊन पर्यायांचा विचार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना देऊन खंडपीठाने याचिका निकाली काढली.
टाळेबंदीच्या काळात, किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारताला करोनामुक्त घोषित करेपर्यंत दारूच्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून दारूच्या विक्रीवर बंदी घालण्याबाबत गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली होती.
न्यायालयाचे निर्देश
राज्य सरकारांनी या काळात मद्याची थेट संपर्काशिवाय विक्री, ऑनलाइन विक्री किंवा घरपोच सेवा यांना परवानगी देण्याचा विचार करावा, असे निर्देश खंडपीठाने राज्यांना दिले, असे याचिकाकर्ते गुरुस्वामी नटराज यांच्या वतीने युक्तिवाद करणारे अॅड. साई दीपक यांनी सांगितले.
विषाणू आणि मद्यव्यवहार..
* देशभरात मद्याची ७० हजार दुकाने, या आठवडय़ात ५ कोटीहून अधिक लोकांकडून मद्यखरेदी.
* मद्यविक्री दुकानांत सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने विषाणू बाधितांमध्ये वाढ.
* टाळेबंदीनंतर करोनाचा फैलाव घटल्याचे दिसत होते, परंतु आता त्यात लक्षवेधी वाढ झाली.