एका ५३ वर्षीय महिलेला गेली ३६ वर्ष एका खोलीत कोंडून ठेवल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आला आहे. एका एनजीओला याबाबत माहिती मिळताच, त्यांनी या महिलेला सोडवले. ती मानसिक रोगी असल्याने तिच्या वडिलांनी तिला एका खोलीत बंद करून ठेवले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंचं स्वप्न दिल्लीत पूर्ण; 24 तास जागी राहणार राजधानी

सपना जैन (५३) असे या महिलेचे नाव असून ती फिरोजाबादच्या टुंडला भागातील मोहम्मदाबाद गावातील रहिवासी आहे. गेली ३६ वर्ष तिच्या परिवारातील सदस्य तिला दरवाज्याखालून जेवण देत असे. तसेच खिडकीतून तिला पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाणी देत असल्याची माहिती एनजीओकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – “भारतात मुस्लिमांपेक्षा भटक्या कुत्र्यांना जास्त मान”, गुजरातमधील ‘त्या’ घटनेवरुन संतापले असदुद्दीन ओवैसी!

दरम्यान, तिच्या वडिलांच्या निधनानंतर भाजप आमदार अंजुला माहौर यांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी सेवा भारती या एनजीओच्या काही पदाधिकाऱ्यांसह तिच्या घरी जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार माहौर यांनी महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा करून तिला आग्रा येथील मानसिक आरोग्य केंद्रात हलवण्यास सांगितले.