दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. या काळात लहान मुलांना उत्साहात सण साजरा करता यावा, यासाठी भारतातील शाळांना किमान दोन आठवडे सार्वजनिक सुट्टी दिली जाते. पण इतर देशात अशा सुट्ट्या दिल्या जात नाहीत. पण पुढील वर्षापासून न्यूयॉर्क शहरातील सरकारी शाळांना दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी राज्य विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार आणि शिक्षण विभागाचे कुलपती डेव्हिड बँक्स हेही उपस्थित होते. दिवाळी हा हिंदुंचा प्रमुख सण आहे. परंतु काही बौद्ध, शीख आणि जैन धर्मातील लोकंही हा सण साजरा करतात. दिवाळीच्या तारखांमध्ये दरवर्षी बदल होत असतो, ही बाब लक्षात घेऊन सरकारी शाळांच्या वार्षिकीमध्ये त्याप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. यंदा पाच दिवसांची सुट्टी २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार, दरवर्षी जूनच्या पहिल्या गुरुवारी अमेरिकेत सर्वत्र ‘अ‍ॅनिव्हर्सरी डे’ साजरा केला जातो. या दिवसाला आधी ‘ब्रुकलिन क्वीन्स डे’ असं म्हटलं जायचं. आता ‘अ‍ॅनिव्हर्सरी डे’ऐवजी दिवाळीची सुट्टी दिली जाणार आहे. पुढील वर्षापासून सरकारी स्कूल कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या सुट्टीचा समावेश केला जाणार आहे.

विशेष म्हणजे न्यूयॉर्क शहरात हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मातील दोन लाखाहून अधिक लोकं राहतात. हे सर्व नागरिक दिवाळी सण उत्सहात साजरी करतात, हीच बाब लक्षात घेऊन न्यूयॉर्कमधील शाळांना दिवाळी निमित्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी निमित्त सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मागील बऱ्याच काळापासून प्रलंबित होता, अशी माहिती जेनिफर राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public school in new york city will get public holiday on diwali from next year 2023 rmm