Puja Khedkar on UPSC decision: माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केल्याचे काही दिवसांपूर्वी जाहिर करण्यात आले होते. मात्र या आदेशाची प्रत आपल्याला मिळालेली नसून ही माहिती माध्यमातून समजली, असा दावा पूजा खेडकर यांनी केला आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले. हे प्रकरण प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्यासमोर सुनावणीसाठी आले होते. आज (बुधवार, ७ ऑगस्ट) यावर युक्तीवाद करण्यात आला.

३१ जुलै रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने एक प्रसिद्धीपत्रक काढून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केल्याची घोषणा केली. पूजा खेडकर यांच्यावर फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. पूजा खेडकर यांनी यूपीएससीचे नियम पायदळी तुडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करून भविष्यात त्यांना यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसता येणार नसल्याचे सांगितले गेले.

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Sadabhau Khot and Sharad Pawar
Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

हे वाचा >> Suhas Diwase on Puja Khedkar : ‘मला त्यांनी रुममध्ये बोलावलं’, पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले…

यूपीएससीने आधी आदेशाची प्रत द्यावी

आज उच्च न्यायालयात न्यायाधीश ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग या पूजा खेडकर यांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. त्यांनी यूपीएससीच्या प्रसिद्धी पत्रकाचा हवाला देऊन सांगितले की, यूपीएससीने उमेदवारी रद्द केल्याचा आदेश आजपर्यंत पूजा खेडकर यांच्या हाती दिलेला नाही. मात्र त्याचवेळी त्याचे प्रसिद्धी पत्रक मात्र माध्यमांना उपलब्ध करून दिले. हे प्रसिद्धी पत्रक रद्द करून पूजा खेडकर यांच्याकडे या आदेशाची प्रत दिली गेली पाहिजे. जेणेकरून त्या योग्य लवादात यासंबंधी अपील दाखल करू शकतील.

पूजा खेडकर यांना यूपीएससीला आव्हान देण्याचा अधिकार

दरम्यान यूपीएससीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, ते दोन दिवसांत उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाची प्रत पूजा खेडकर यांना देतील. तसेच उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करण्याची मुभा दिली आहे.