Pulwama encounter : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत अल-बद्रचे दोन अतिरेकी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, “दहशतवाद्यांच्या ठावठिकाणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बुधवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे पुलवामा येथे नाकेबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. लपलेल्या अतिरेक्यांनी प्रत्युत्तर देणाऱ्या सैन्यावर गोळीबार केल्याने सैन्य दलाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.”
प्राथमिक गोळीबारानंतर नासुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कारवाई काही वेळ थांबवण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांना बाहेर काढल्यानंतर, पुन्हा पुन्हा कारवाईला सुरूवात केली आणि बुधवारी रात्री एक अतिरेकी मारला गेला, तर एक सैनिक जखमी झाला, असे त्यांनी सांगितले. रात्री गोळीबार सुरू असताना आणखी एक अतिरेकी मारला गेला, अशी माहिती देखील अधिकाऱ्याने दिली.
दहशतवादी अल-बद्र संघटनेशी संबंधित
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP ) विजय कुमार म्हणाले की, “दोन दहशतवादी अल-बद्र संघटनेशी संबंधित आहेत.दोन्ही ठार झालेल्या दहशतवादी हे स्थानिक असून एकाचे नाव एजाज हाफिज आणि शाहिद अयुब असं आहे. २ एके रायफल्स (02 AK rifles) जप्त करण्यात आल्या आहेत. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये पुलवामा येथे बाहेरील मजुरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता,” असे आयजीपी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.