पुण्याच्या आयसिस मॉड्युलशी संबंधित असलेला मोस्ट वॉंटेड दहशतवाही रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. १५ ऑगस्ट पूर्वी दिल्ली पोलिसांना हे यश आलं असून स्वातंत्रदिनाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे.

हेही वाचा – Serial Killer In UP: सीरियल किलरची दहशत; १४ महिन्यात ९ महिलांची एकाच पद्धतीने हत्या

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रिझवानला दिल्लीतील गंगा बख्श मार्गावरून ताब्यात घेण्यात आलं आहे, रिझवान या ठिकाणी असल्याची गुप्त माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. यावेळी रिझवानला शस्त्रास्रांसह पकडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन मोबाईल फोन जप्त केले.

रिझवान अब्दुल दिल्लीतील दर्यागंज येथील राहणारा असून तो पुण्याच्या आयसिस मॉड्युलशी संबंधित होता. तसेच एनआयएने त्याच्या ३ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते. तो एनआयएच्या मोस्ट वॉंटेड यादीतही होता. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते. गेल्या वर्षी त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली होती. या वर्षी मार्चमध्ये एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवानसह एकूण ११ जणांवर आरोप करण्यात आले होते. हे प्रकरण पुण्यातील आयसिसशी संबंधित शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि साहित्य जप्त करण्याशी संबंधित आहे.