Pune Porsche Crash Latest Updates : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात पोर्श गाडीखाली एक तरुण जोडपं ठार झालं. पोर्श गाडीत असलेल्या अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत ही गाडी चालवली, म्हणून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. याप्रकऱणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, या अपघातात मृत्यू पावलेल्या २४ वर्षीय अश्विनी कोस्टाच्या पार्थिवावर अखेर ५० तासांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. उमलत्या वयातील लेकीच्या देहाला अग्नी देताना तिच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. पुणे टाईम्स मिररने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अश्विनी कोस्टा हिच्यावर मंगळवारी सकाळी तिच्या गावी जबलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोस्टा हिने वाडिया महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होती. रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास कल्याणीनगर विमानतळ रोडवर पोर्श कारने २ जणांना धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचा चालक अनिश अवधिया याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी अश्विनी कोस्टा हिचे पार्थिव तिच्या गावी पोहोचले आणि आज मंगळवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

पुणे टाईम्स मिररशी बोलताना अश्विनी कोस्टाची चुलत बहिण म्हणाली, “अश्विनी आता आमच्यात नाही हे सत्य पचवणं आणि स्वीकारणं खूप कठीण झालं आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्था आम्हाला सहानुभूती दाखवून आम्हाला आणि अश्विनीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करतील अशी आम्ही प्रार्थना करतो.”

हेही वाचा >> Pune Porsche crash:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..

अश्विनी कोस्टाच्या आईची काय प्रतिक्रिया?

अश्विनीची आई ममता म्हणाल्या, “माझी लेक आमच्यासाठी एक उमलणारं गुलाब होती. आम्ही तिला निरोपही देऊ शकलो नाही. हा अपघात इतका क्रूर होता की तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. तिच्यावर आम्ही योग्य अंत्यसंस्कारही करू शकलो नाही.”

हेही वाचा >> Pune Porsche Accident : “ऑनलाईन बिलांवरून स्पष्ट झालंय की…”, ‘त्या’ व्हायरल VIDEO बाबत पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टकरण

दरम्यान, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे युद्धपातळीवर तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तसंच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केलं होतं हे स्पष्ट झालं आहे. या बारमधील बिलंही पोलिसांनी तपासली असून अल्पवयीन मुलाला मद्यप्राशन करण्यास परवानगी दिल्याच्या गुन्ह्याअंतर्गत बारमालक आणि व्यवस्थापकलाही पोलिसांनी अटक केली आहे. तर, या मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Story img Loader